S M L

मतांच्या 'इन्कम'साठी भाजपचा 'टॅक्स' मुक्तीचा फंडा

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2014 05:25 PM IST

Image img_232332_senabjp_240x180.jpg16 जानेवारी : मध्यमवर्ग हा तसा भाजपचा पारंपरिक मतदार..पण, हा मतदार सध्या आम आदमी पक्षाकडे आकर्षित झालाय. या वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप कररचनेच्या सूसुत्रीकरणाचा ठराव आणण्याचा विचार करत आहे.

भाजप नेत्यांची आज(गुरूवारी) संध्याकाळी दिल्लीत पक्षकार्यालयात बैठक होतेय. त्यात या ठरावाचा आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे शुक्रवारी भाजप कार्यकारिणीची बैठक होतेय. तर 18 आणि 19 तारखेला पक्षाची राष्ट्रीय परिषद पार पडतेय. या राष्ट्रीय परिषदेत कररचना सूसुत्रीकरणाचा हा ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

भाजपची काय रणनीती असणार ?

  • - सर्वसामान्य नोकरदार भरत असलेला इन्कम टॅक्स सरसकट रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपच्या काही नेत्यांनी दिला होता
  • - त्याशिवाय अनेक प्रकारचे कर रद्द करावे, त्याऐवजी बँकखात्यात जमा होणार्‍या प्रत्येक रकमेवर 2 टक्के लेव्ही लावण्याचा हा प्रस्ताव आहे.
  • - पण, भाजपमधल्याच अनेकांचा या प्रस्तावाला विरोध आहे
  • - त्याऐवजी कररचनेत सूसुत्रता आणणारा ठराव करावा, असं अनेकांचं मत आहे
  • - 18 आणि 19 तारखेला होणार्‍या भाजपच्याा राष्ट्रीय परिषदेत हा अर्थविषक ठराव आणि राजकीय ठराव मंजूर करण्यात येतील
  • - आर्थिक प्रस्तावांबाबत या आठवड्याच्या सुरुवातीला संघाचे वरिष्ठ नेते आणि भाजप नेत्यांची चर्चा झाली होती
  • - 19 जानेवारीला मोदी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2014 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close