S M L

काँग्रेसला संपवणारे स्वत: संपतील -राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2014 10:02 PM IST

काँग्रेसला संपवणारे स्वत: संपतील -राहुल गांधी

iacc rahul gandhi17 जानेवारी : पाच राज्याच्या निवडणुकीत पराभव, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काळवंडलेल्या काँग्रेस पक्षाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'पॉवर स्टार्ट' देण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज राहुल गांधी यांनी अतिशय आक्रमकपणे भाषण केलं. काँग्रेस हा एक पक्ष नसून एक विचारधारा आहे, हा जनतेचा विचार आहे. जर कुणी काँग्रेसला संपवण्याची भाषा करते असेल तर ते स्वत: संपुष्टात येतील असं कणखर भाषण राहुल यांनी केलं.

काँग्रेसचा हात आम आदमीसोबतच

आयसीसीच्या परिषदेत राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण करुन सर्वांची वाहवा मिळवली. राहुल गांधी म्हणतात, आम्ही गेल्या दहा वर्षात खूप चांगलं काम केलं आहे. देशाच्या विकासाच्या पायाभरणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. देशातील जनतेला काँग्रेसने अनेक अधिकार दिले आहे. आरटीआय कायदा, लोकपाल विधेयक, आधार योजना, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा सारख्या योजना काँग्रेसनेच जनतेला दिल्या आहेत. सरकारने 14 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्याचं मोलाच कार्य केलंय असा दावाही राहुल यांनी केलाय. निवडणुकीत कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं जाईल. खर्‍या अर्थाने कार्यकर्तेच ही निवडणूक लढवणार आहे. पक्षाचं नेतृत्व हे कार्यकर्त्यांवरच आहे. त्यांचे विचार घेऊनच काँग्रेस आपला जाहीरनामा तयार करले आणि या कार्यकर्त्यांचं ऐकणं हे सरकारचं काम आहे असं म्हणत तरुणांना नेतृत्वासाठी पुढे आणायला हवं असंही राहुल म्हणाले.

12 सिलेंडर द्या

काँग्रेस पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार नाही हे स्पष्ट झालंय. निवडणुकीअगोदर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे ही आमची परंपरा नाही. मी एक सैनिक आहे त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन, असं राहुल गांधींनी जाहीर केलं. महिला संघटनांकडून मला खूप शिकायाला मिळालं. यापुढे महिलांना 50% आरक्षण देण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल, येणार्‍या काळात देशात सर्वाधिक महिला या मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी महिलांच्या किचन बजेटकडेही लक्ष दिलं. अनुदानित 12 सिलेंडर सवलतीत द्या, अशी मागणीच राहुल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली.

 हुकूमशहा देश चालवू शकत नाही

राहुल यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. देशाची ताकदही लोकशाही आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीच्या विचारांवर हा देश चालू शकणार नाही. हुकूमशहा देश चालवू शकत नाही, अशी टीका मोदींचं नाव न घेता केली. तसंच राहुल यांनी आम आदमी पार्टीवरही टीका केली. काही पक्षांचं मार्केटिंग चांगलं आहे. या लोकांचं मार्केटिंग इतकं चांगलं आहे की, ही लोकं टक्कल पडलेल्या माणसाला कंगवाही विकतील अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2014 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close