S M L

सलमान करणार राहुल गांधींचा प्रचार?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 21, 2014 10:17 PM IST

सलमान करणार राहुल गांधींचा प्रचार?

21 जानेवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंगबाजी करणारा 'दबंग'स्टार सलमान खान आता राहुल गांधींसाठीही पुढे सरसावलाय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना माझी गरज असल्यास किंवा त्यांची इच्छा असल्यास आगामी निवडणुकीत त्यांचाही प्रचार करीन असं सलमान खानने म्हटलं आहे.

अलीकडेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला आपल्या आगामी फिल्म 'जय हो' प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी त्याने मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. याआधी सलमान खानने आम आदमी पार्टीबद्दल वक्तव्य केलं होतं.

राहुल गांधी मला राजकारणी म्हणून आवडतात. त्यांना प्रचारासाठी माझी गरज वाटल्यास मी त्यांची नक्कीच मदत करेन. मोदी आधीच इतके प्रसिद्ध आहेत त्यांना माझी काय गरज. देशातील प्रत्येक राज्य हे सारखे आहे आणि त्याला सारखेच महत्व दिले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक नेत्याला समान महत्व दिले पाहिजे. देशात चांगली कामगिरी करणार्‍या नेत्याला महत्त्व देणं गरजेच आहे असं मत सलमानने व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2014 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close