S M L

'आप'पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2014 01:48 PM IST

735 delhi aap 3422  जानेवारी : रेल भवन परिसरात दोन दिवस आंदोलन करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे मात्र या एफआयआरमध्ये केजरीवाल यांचं नाव नाही.

दिल्ली पोलिसांनी संसदीय मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पक्षाविरोधात कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये कलम 144चा भंग, हिंसा आणि जमावाला भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव या एफआयआरमध्ये जरी नसलं तरी वेळ पडल्यास नायब राज्यपालांची परवानगी घेऊ न त्यांना अटक करू असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

दिल्ली पोलीस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सोमवारपासून धरणे आंदोलन करणारे केजरीवाल यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेतले. पाच पोलीस अधिकार्‍यांपैकी दोन पोलीस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2014 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close