S M L

'आप'ची पंचाईत, भारतींच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2014 01:47 PM IST

'आप'ची पंचाईत, भारतींच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

somnath bharti 4323 जानेवारी : दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढतंच चाललाय. युंगाडाच्या महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

त्यातच आरोपी महिलेनं भारती यांना ओळखल्यानं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली.

दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, अशा बैठकांना हजर असणारे पोलीस आयुक्त यावेळी हजर नव्हते. केजरीवाल यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ नायब राज्यपालांच्या भेटीला गेलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2014 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close