S M L

'आप'च्या फंडिंगला लागली गळती

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2014 11:35 PM IST

'आप'च्या फंडिंगला लागली गळती

donate aap24 जानेवारी : दिल्लीत आम आदमी पार्टीने सत्ता स्थापन करुन महिना उलट नाही तेच नवनवीन वाद एकतर ओढून घेत आहे अन्यथा निर्माण होत आहे. त्यामुळे या वादाचा थेट परिणाम त्यांना मिळणार्‍या फंडिंगवर झालाय. दररोज मिळणार 10 लाखांचा निधी आता तीन लाखांवर आला आहे. तब्बल सात लाखांची घट निधीत झालीय. आता ही निधी दिवसेंदिवस आणखी खाली घसरत चाललाय.

निवडणुकीच्या आधी 'आप'च्या तिजोरीत तब्बल 20 कोटीचं फंडिंग गोळा झाल्यामुळे मोठा वाद झाला होता. पण हा सर्व निधी लोकांनी दिलाय असं पक्षांनी ठामपणे सांगितलं. एखाद्या नवख्या पक्षाकडे इतका मोठा निधी ऐकून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं तर विरोधकांनी एकच टीका केली. पण निवडणुकीत ऐतिहासिक विजय आणि त्यानंतर मोठ्या पेचानंतर सत्ता स्थापन केल्यामुळे सर्वत्र 'आप'चं कौतुक झालं. पण सत्ता स्थापनेपासूनच आपमध्ये वादावादी सुरू झाली.

'आप'मध्ये बंडोबांनी दंड थोपाटले. त्यामुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. हे थांबत नाही तेच कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांना आदेश दिले ते त्यांनी ऐकले नाही म्हणून थेट पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवस रस्त्यावर उतरले आणि धरणं आंदोलन केलं. आणि तिसरा वाद म्हणजे पक्षाचे स्टार नेते कुमार विश्वास यांनी 2008 साली केरळ मधील नर्सबद्दल असभ्य वक्तव्य केलं त्यामुळे त्यांना माफीनामा सादर करावा लागला. त्यामुळे पक्षावर सर्वत्र टीका होत आहे. एवढ्यासगळ्या वादळ वादामुळे पक्षाच्या फंडिंगवर परिणाम झालाय. आपला 3 ते 15 जानेवारीदरम्यान दररोज जवळपास 10 लाख रुपये निधी मिळत होता. पण वादाचे ग्रहण लागल्यामुळे 10 लाख रुपयांहून अधिक मिळणार्‍या निधीच्या रकमेत आता तीन लाखांपर्यंत कमी झालाय. 16 जानेवारीला पार्टीला मिळालेल्या ऑनलाईन डोनेशनतून पक्षाच्या खात्यात सुमारे साडेचार लाख इतकी रक्कम जमा झाली होती तर दुसर्‍या दिवशी हा आकडा दीड लाखांपर्यंत खाली आलाय.

'आप'ला जानेवारीत मिळालेल्या निधीत घट

3 ते 15 जानेवारी - दररोज जवळपास 10 लाख रुपये

16 जानेवारी - 4.45 लाख रुपये

17 जानेवारी - 1.50 लाख रुपये

18 -22 जानेवारी दररोज जवळपास तीन लाख रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2014 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close