S M L

'आप'च्या 'वादमय' सत्तेला महिना पूर्ण

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2014 03:17 PM IST

aap vs delhi police 34564328 जानेवारी : बरोबर एक महिन्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या एक महिन्यात आपची सत्ता म्हणजे काही वाद, काही आश्वासनांची पूर्तता, अनेक अपूर्ण आश्वासनं आणि आपच्या सरकार चालवण्याच्या क्षमतेवर उपस्थित झालेली काही प्रश्नचिन्हं यांचं समीकरण आहे.

दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली-तेव्हा निर्माण झाली होती एक आशा, एक ताजेपणा आणि एक विश्वास..एक महिना पूर्ण होतोय आणि सत्ताधारी पक्ष आणि त्याचे नेते हे सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले दिसत आहे. पण याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारलं तर आपण इतरांपेक्षा बरंच काही साध्य केलंय यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

वीजबिलात 50 टक्के कपात आणि दर महिना 20 हजार लिटर मोफत पाणी ही 'आप'नं पूर्ण केलेली पहिली आश्वासनं..पण ही आश्वासनं प्रत्यक्षात उतरणं किती शक्य आहे याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

आणि आणखीही अनेक आश्वासनं आहेत, ज्यांची पूर्तता अजून झालेली नाही- उदाहरणार्थ सत्तेवर आल्यानंतर एक महिन्याच्या आत जनलोकपाल बिल आणण्याचं आश्वासन 'आप'नं दिलं होतं. तसंच बेघर लोकांना तात्पुरता निवारा उभारुन देण्याचं आश्वासनही 'आप'नं दिलं होतं. याबद्दल हायकोर्टानेही सरकारला चपराक लगावली होती. तसंच महिला कमांडो फोर्स स्थापन करण्याबाबतही अजून प्रगती व्हायची आहे.

पण भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना उघड करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी सुरू करण्यात आलेली हेल्पलाईन, नर्सरीच्या प्रवेशसाठीची हेल्पलाईन, केजरीवाल यांनी स्वत:ची कार वापरून तसंच सुरक्षा नाकारून व्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्याचा केलेला प्रयत्न या सगळ्यांना जनतेचा चांगलाच पाठिंबा मिळाला.

त्याउलट कायदामंत्री सोमनाथ भारतींची मध्यरात्री टाकलेली धाड आणि मुख्यमंत्री केजरीवालांचं रायसिना रोडवरचं धरणं यावर टीकाही झाली. 'आप'च्या सरकारनं या एका महिन्यात कौतुक आणि टीका दोन्ही अनुभवलं. नुकत्याच झालेल्या वादांमुळे आपच्या प्रतिमेला काहीसा तडा गेला असला तरी त्यांनी देशाच्या राजकारणाची दिशा वळवली हेही तितकंच खरंय. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2014 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close