S M L

राष्ट्रवादीने घेतली नरेंद्र मोदींची बाजू !

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2014 03:58 PM IST

prafull patel29 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रचारप्रमुख राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2002 च्या गुजरात दंगलीला मोदी सरकारने प्रोत्साहन दिले असा आरोप केला होता. यामुळे संतापलेल्या भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली पण आता यूपीएच्या मित्रपक्षांनी काँग्रेसला हादरा दिलाय.

काँग्रेसचे महत्त्वाचे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि नॅशनल कॉन्फरन्सनं काँग्रेसला धक्का देणारी वक्तव्य केली आहे. 2002 दंगलीप्रकरणी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवाय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलंय. 2002 दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या एसआयटीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली होती.

त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य म्हणजे मोदींना अप्रत्यक्ष पाठिंबाच आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी यूपीएमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली होती. तर काँग्रेसचा दुसरा मित्रपक्ष नॅशनल कॉन्फरन्सही युतीबाबत फेरविचाराचे संकेत दिले आहे. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर आपला पक्ष जनमताचा आदर करेल, असं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

प्रफुल्ल पटेल म्हणतात,

"न्यायव्यवस्था हीच न्याय मिळण्याची अंतिम जागा आहे. मला कुणाच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया द्यायची नाही. पण, सत्य हे आहे की, आपण सध्या अशा युगात राहतोय जिथे न्याय देण्यासाठी किंवा एखाद्या मुद्दा तडीस नेण्यासाठी न्यायालयं अंतिम आहेत. आणि जर न्यायालयांनी एखादा निकाल दिला असेल तर मला वाटतं आपण सर्वांनी त्याचा आदर राखला पाहिजे आणि त्यावर प्रश्न उपस्थित करायला नको."

नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसवर नाराज

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. मोदी जर पंतप्रधान झाले तर ती लोकांची इच्छा आहे आणि आपल्या पक्षाला ते मान्य असेल, असं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचं म्हणणं आहे. पण NDA त जाणार का, यावर ते काहीच बोलायला तयार नाहीत. युपीएमधून बाहेर पडायचं की नाही, हा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाच घेतील असं फारुख यांनी म्हटलं आहे. तर युपीए तुटल्यामुळे जम्मू आणि काश्मिर सरकारमधून काँग्रेसनं आपला पाठिंबा जरी काढून घेतला, तरी सरकार पडणार नाही, ही महत्वाची बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2014 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close