S M L

''आप'सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 20 कोटींची ऑफर'

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2014 05:11 PM IST

''आप'सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 20 कोटींची ऑफर'

aap mla 3403 फेब्रुवारी : दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आम आदमी पार्टीचे आमदार मदनलाल यांनी केलाय. ही ऑफर देणारी व्यक्ती गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जवळची असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

गेल्या डिसेंबरमध्येच पक्ष सोडण्यासाठी आपल्याला ही ऑफर मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं निलंबित आमदार विनोदकुमार बिन्नी आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे, तीन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. हे तीन आमदार म्हणजे आपचे बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी, जेडीयूचे शोएब इकबाल आणि अपक्ष आमदार रामबीर शोकीन हे आहेत. 48 तासात आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पाठिंबा काढून घेऊ, अशी तंबी या तिघांनी सरकारला दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2014 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close