S M L

'चाय पे चर्चा नमो के साथ' भाजपची मोहीम

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2014 11:43 AM IST

gujrat narendra modi04 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झालीय. काँग्रेसने जाहिरातबाजी करण्यास सुरूवात केली तर दुसरीकडे भाजपनेही थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 'चहा घेणार का' असा आग्रह केलाय. पण हा चहा काही साधासुधा नाही तर हा चहा घेता येणार आहे थेट नरेंद्र मोदी यांच्यासोबत. 'चाय पे चर्चा नमो के साथ' अशी मोहीमच भाजपने हाती घेतली आहे.

12 फेब्रुवारीपासून भाजप देशभरात 'चाय पे चर्चा नमो के साथ' ही मोहीम सुरू करणार आहे. देशभरातल्या हजारो ठिकाणी ही चर्चा घडवण्याचा भाजपचा निर्णय आहे. खुद्द नरेंद्र मोदी 'व्हिडिओ काँफर्न्स'व्दारे जनतेशी चहा घेत चर्चा करणार आहे. एका सभेत नरेंद्र मोदींनी आपण लहानपणी चहा विकत होतो असं म्हटलं होतं. देशाचा भावी पंतप्रधान आणि चहावाला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. भाजपनेही याला उत्तर दिलं. पण आता याच चहाचा वाद भाजपने आपली ताकद म्हणून वापरायचं ठरवलंय.

येत्या 12 फेब्रुवारीपासून 'चाय पे चर्चा नमो के साथ' ही मोहीम सुरू होणार आहे. देशातील 300 शहरांमध्ये एक हजाराहुन अधिक ठिकाणी चहाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवर नरेंद्र मोदी व्हिडिओ काँन्फर्सव्दारे थेट जनतेशी चर्चा करणार आहे. दोन तासांचा हा कार्यक्रम असणार असून यात सुरुवातीला अर्धा तास मोदी आपले विचार मांडणार आहे. त्यानंतर दीड तास जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. ही मोहीम दर पाच दिवसानंतर वेगवेगळ्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने जनतेशी संवाद साधण्याच्या बळावर सत्ता स्थापन केली. भाजप आमचीच नक्कल करत आहे अशी टीका आपने केलीय. पण भाजपने आपचे आरोप फेटाळून लावले. या मोहिमेच्या माध्यमातून मोदी आपले विचार अशा भागात पोहचवू शकता जिथे ते जाऊ शकत नाही असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2014 08:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close