S M L

तेलंगणावरून गोंधळ; लोकसभा उद्यापर्यंत तहकूब

Samruddha Bhambure | Updated On: Feb 5, 2014 04:05 PM IST

Image img_217132_loksabha34356_240x180.jpg05 फेब्रुवारी : 15 व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू झालं. जातीय हिंसाविरोधी बिलावर राज्यसभेत काही वेळ चर्चा झाली. पण नंतर विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे या विधेयकावरची चर्चा पुढे ढकलण्यात आली.

लोकसभेपाठोपाठ राज्यसभाही तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेचं कामकाजही उद्या 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. आजच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच तेलंगणाच्या मुद्यावरून आंध्रप्रदेशच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानं लोकसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आलं

दरम्यान, आज संसदेचे कामकाज सुरु होताच सीमांध्र भागामधील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या दोन्ही भवनांमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तेलंगणच्या मुद्याबरोबरच, दिल्लीमध्ये मारहाणीमध्ये मृत्यु झालेल्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्याचा उल्लेखही लोकसभेमध्ये काही खासदारांनी केला.

या विद्यार्थ्यास मारहाण केलेल्या दोषींना शासन करावे व ईशान्य भारतामधील नागरिकांविरोधातील वांशिक शेरेबाजी त्वरित थांबवावी, अशा मागण्या या खासदारांनी केल्या.लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी यावेळी खासदारांनी शांत राहून सभागृहाचे कामकाज सुरळित चालु द्यावे, असे आवाहन केले. संसदेच्या या अधिवेशनाची मुदत 21 फेब्रुवारीपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2014 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close