S M L

थर्ड फ्रंट देशाला थर्ड ग्रेड बनवेल -मोदी

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2014 11:29 PM IST

narendra modi05 फेब्रुवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी) कोलकाता इथं भव्य सभा घेतली. ममता बॅनर्जी यांच्या बाल्लेकिल्ल्यात घेतलेल्या रॅलीत मोदींनी तिसर्‍या आघाडीवर जोरदार टीका केली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर तिसर्‍या आघाडीला जनतेचा कळवळा येतो, त्यामुळे तिसरी आघाडी देशाला थर्ड ग्रेड बनवेल अशी टीका मोदी यांनी केली.

कोलकात्यातील रॅलीला मोठ्या संख्येत लोकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आज बुधवारी दिल्लीत तिसर्‍या आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत 11 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यामध्ये समाजवादी पार्टी, सीपीएम, जेडीयू, कम्यूनिस्ट पार्टी, जेडीएस आणि एआईएडीएमके सामील होते.

मोदींनी या बैठकीचा समाचार घेतला. तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांनी हवा कोणत्या दिशेने वाहते आहे हे लक्षात घ्यावे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांनी जनतेची आठवण येते अशी टीका मोदींनी केली. यावेळी त्यांनी मुस्लिम कार्डही वापरले. गुजरात मधील मुस्लिमांपेक्षा पश्चिम बंगालमधील मुस्लीम मागासलेले आहे असंही मोदी म्हणाले. मात्र नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात रॅली घेतली पण ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्याचं टाळलं. ममता यांच्या कामाचा हिशेब लोक विधानसभा निवडणुकीत घेतील पण लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला विजयी करावं असं आवाहन मोदींनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2014 07:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close