S M L

स्फोटांना मोहन भागवतांची संमती, असीमानंदांचा दावा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 6, 2014 07:44 PM IST

स्फोटांना मोहन भागवतांची संमती, असीमानंदांचा दावा

TH18_ASEEMANAND_PTI_706989e06 फेब्रुवारी :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची मान्यता मिळाल्यावरच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याचे, या स्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असीमानंद यांनी हा खुलासा केल्याने संघ आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  'मोहन भागवत यांनीच 2007 च्या स्फोटासाठी हिरवा कंदील दाखवला होता. हे होणं खूप महत्त्वाचं आहे. पण याचा दोष संघावर यायला नको, असं भागवतांनी सांगितलं होतं. याचा संबंध संघाशी जोडू नका, अशी सूचनाही भागवतांनी केली होती', असं असीमानंद यांनी म्हटलं आहे.

'कॅरव्हान' या मासिकाने हा गौप्यस्फोट केला आहे. असिमानंद यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीचे ऑडिओ टेप्सही आपल्याकडे असून त्या प्रसिध्द करत असल्याचा दावाही या मासिकाने केला आहे.

2007 मध्ये समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात शंभरहून अधिक जण मृत्यूमुखी पडले होते. तर, 70 हून अधिक जखमी झाले होते. समझौता एक्स्प्रेस, हैदराबदमधली मक्का मस्जिद, अजमेर दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटांमागे हिंदुत्ववादी शक्ती असल्याचा दावा करण्यात येत होता. पण अशी कोणतीही मुलाखत झाली नसल्याचं असिमानंदच्या वकिलांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हे षड्‌यंत्र असल्याचा आरोप भाजपनं केलाय. तर आरोपाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केलीय.

कॅराव्हनला दिलेल्या मुलाखतीत असीमानंदनं काय म्हटलंय ?

'मोहन भागवत यांनीच 2007 च्या स्फोटासाठी हिरवा कंदील दाखवला होता. हे होणं खूप महत्त्वाचं आहे. पण याचा दोष संघावर यायला नको, असं भागवतांनी सांगितलं होतं. याचा संबंध संघाशी जोडू नका, अशी सूचनाही भागवतांनी केली होती.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2014 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close