S M L

नायब राज्यपाल काँग्रेसचे दलाल, 'आप'ची आगपाखड

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2014 10:39 PM IST

kejriwal07 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीने वचनपूर्ती करत जनलोकपाल विधेयक मंजूर केलं. पण केंद्र सरकारची मंजुरी न घेता दिल्ली सरकारनं जनलोकपाल बिलाची अंमलबजावणी केली तर ते घटनाबाह्य ठरेल, असं मत सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांनी नोंदवलंय. त्यामुळे संतापलेल्या 'आप'च्या नेत्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना लक्ष्य केलं. नायब राज्यपाल काँग्रेसचे दलाल आहे अशी टीकाच आपच्या नेत्यांनी केलीय.

दिल्लीच्या आप सरकारने जाहीरनाम्यात जनलोकपाल बिल आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे हे विधेयक आणण्यात आलं. पण केंद्राच्या मंजुरीशिवाय बिल पारित करणं हे असंवैधानिक असल्याचं मत सॉलिसिटर जनरलनं नोंदवलं आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी याबाबत सॉलिसिटर जनरलचं मत मागवलं होतं. दरम्यान, या मुद्द्यावर राजकारण होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय.

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नजीब जंग यांना एक पत्रही लिहलंय. यामध्ये केजरीवाल म्हणतात, जर राज्यघटनेनुसार अशी कोणतीही अट नाही की, केंद्राची मंजुरी घेऊन विधेयक विधानसभेत सादर करावे. जर विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्राची मंजुरी लागत असेल तर सरकार बनवण्याची काय गरज होती. राज्यपालांवर काँग्रेस आणि गृह मंत्रालयाचा दबाव आहे. राज्यपालांनी देशाच्या राज्यघटनेसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे कोणत्याही पक्ष किंवा खात्याबद्दल प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली नाही असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल एवढ्यावर थांबले नाही तर जर विधेयक पास करण्यासाठी केंद्राची मंजुरी लागतच असेल तर निवडणुका घेतल्याचं कशाला ? केजरीवाल राज्यघटनेच्या विरोधात काम करत नाहीय, भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत आहोत. त्यामुळे देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आहे यात काही कंपन्या आणि माध्यमातील लोकं पण सामील आहे असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2014 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close