S M L

न्यूयॉर्कमध्ये गांधीजींच्या वैयक्तिक वस्तूंचा लिलाव पाच मार्चला

3 मार्च गांधीजींच्या वैयक्तिक वस्तूंचा लिलाव ठरल्याप्रमाणे पाच मार्चला न्यूयॉर्कमध्ये होतोय. याविरोधात भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तरीही, भारत सरकारनं लिलावकर्त्यांशी अजून कुठलाच संपर्क साधलेला नसल्याचं समजतंय. त्यामुळे या वस्तू लिलावात विकण्याचा निर्णय लिलावकर्त्यांनी घेतलाय. काहीही झालं तरी गांधीजींच्या वस्तू मायदेशी परत आणणारच, अशी ठाम भूमिका काही दिवसांपूर्वीच सरकारनं घेतली होती. पण, या वस्तूंचा लिलाव रोखण्यासाठी सरकारनं विशेष असे प्रयत्न केले नसल्याचं दिसतंय. न्यूयॉर्कमधल्या एंटिकोरम ऑक्शन हाऊसशी सरकारनं अजून संपर्कच केला नसल्याची खात्रीशीर बातमी मिळालीय. त्यामुळे ठरल्याप्रमाणं गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव पार पडणार आहे. या वस्तूंचे सध्याचे मालक जेम्स ओटीस यांनी या वस्तू लिलावातून काढून घेण्याची तयारी दाखवलीय. मात्र त्यासाठी भारत सरकारनं देशातल्या गरिबांची मदत वाढवावी आणि त्यांचा जीडीपी एक टक्क्यावरून पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन द्यावं, अशी अट त्यांनी घातलीय. या लिलावात 364 वस्तू आहेत. त्यात गांधीजींचा चष्मा, चपला, खिशातलं घड्याळ, आणि ताट वाटी या वस्तूंचा समावेश आहे. शिवाय आणखी दोन नव्या वस्तूंची त्यात भर पडलीय. दिल्लीतल्या हॉस्पिटलनं दिलेला गांधीजींचा ब्लड रिपोर्ट आणि गांधीजींचं हस्ताक्षर असलेलं विद्यार्थ्यांचं टेलिग्राम...या लिलावातून मोठी रक्कम मिळेल, असा लिलावकर्त्यांना विश्वास आहे. भारत सरकार आणि लिलावकर्ते यांच्यात समझोता झाला नाही तर, राष्ट्रपित्याचा हा अनमोल ठेवा इतर वस्तूंसारखाच लिलावात विकला जाईल. न्यूयॉर्कमध्ये होणारा गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव रोखण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टानं दिलेत. केंद्र सरकारनं या आदेशाचं स्वागत केलंय. या आदेशामुळे गांधीजींच्या वस्तू मायदेशी परत आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2009 03:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2009 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close