S M L

अंबानी, देवरा आणि मोईलींविरोधात FIR दाखल करा -केजरीवाल

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2014 03:13 PM IST

अंबानी, देवरा आणि मोईलींविरोधात FIR दाखल करा -केजरीवाल

kejru11 फेब्रुवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्प मोईली व रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यामधील संगनमतामुळे गॅसच्या किंमती वाढवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोला मुकेश अंबानी, मुरली देवरा, वीरप्पा मोईली, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर काही जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. रिलायन्सने देशात गॅसचे कृतिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी केला आहे.यासंदर्भात चार जणांवर दिल्ली सरकारकडं तक्रार केल्या आहेत.

माझ्या सरकारमधल्या 4 जणांनी रिलायन्स विरोधात तक्रार केली आहे. एक वर्षापूर्वी रिलायन्सला गॅसच्या विहिरी दिल्या होत्या त्याची किंमत 1 डॉलरपेक्षाही कमी होती. त्यांना 17 वर्षांपर्यंत 2.30 डॉलर्सला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 4 डॉलर इतका भाव वाढवला. त्यामुळे गटंचाई निर्माण झाल्याचा भास निर्माण करूण केवळ 18 टक्के गॅस दिला गेला आहे. त्यावर येत्या एप्रिलमध्ये दुप्पट भाडेवाढ करणार आहेत. त्यामुळे गॅसची किंमत 8 डॉलर पर्यंत जाण्याची शक्तता आहे.त्याच बरोबर कृष्णा-गोदावरी खोर्‍यातून निघणार्‍या गॅसच्या किंमती वाढवण्यासाठी रिलायन्सने काही मंत्र्यांशी संधान बांधलं, असं आरोप त्यांनी केला.

रिलायन्सची सहकंपनी असलेल्या नायको बांगलादेशला हाच गॅस कमी दराने गॅस विकते, असंही ते म्हणाले. रिलायन्सकडून गॅसच्या विहिरी परत घ्याव्यात अशी विनंती पंतप्रधान मनमोहन सिंग आणि वीरप्पा मोईली यांना करणार असल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, केजरीवाल यांना राज्यकारभार कसा करतात त्याची माहिती नाही, अशी टीका पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केलीये. गॅसचे दर ठरवण्याची पद्धत तज्ज्ञांनी ठरवलेली असते असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2014 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close