S M L

तिढा सुटणार, तेलंगणा विधेयक उद्या संसदेत ?

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2014 07:12 PM IST

Image img_236962_loksabha44_240x180.jpg12 फेब्रुवारी : तेलंगणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार अखेरचे प्रयत्न करतंय. हे विधेयक उद्यातरी संसदेत मांडता यावं, हाच आमचा प्रयत्न असेल असं काँग्रेसनं म्हटलंय.

तर याच मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज (बुधवारी) भाजप नेत्यांना लंचसाठी बोलावलं होतं. यावेळी काँग्रेसने अंतर्गत वाद मिटवावे, असा सल्ला भाजपने दिलाय. तर काँग्रेसचेच खासदार पल्लम राजू यांनी सरकारनं ज्या पद्धतीनं तेलंगणा मुद्दा हाताळला, त्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.

सीमांध्रसाठी पॅकेजची घोषणा करून विरोधकांची समजूत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भ्रष्टाचारविरोधी विधेयकांसाठी आग्रह न धरता अध्यादेश काढण्याचाही सरकारचा विचार आहे. या लंचसाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2014 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close