S M L

अमेरिकेनं उठवला नरेंद्र मोदींवरचा 9 वर्षांचा बहिष्कार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2014 01:33 PM IST

अमेरिकेनं उठवला नरेंद्र मोदींवरचा 9 वर्षांचा बहिष्कार

modi13 फेब्रुवारी :  गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरीलनरेंद्र मोदींवरचा 9 वर्षांचा बहिष्कार उठवला आहे.भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी गुरूवारी मोदींची भेट घेतली.गांधीनगर येथे मोदींच्या निवासस्थानी जाऊन पॉवेल यांनी मोदींशी चर्चा केली.

भारतातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे अमेरिकेने आपले नरेंद्र मोदी विरोधी धोरण बदलण्याचा विचार करत हे पाऊल उचलल्याचे चित्र दिसत आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताबरोबरील भविष्यातील संबंधांच्यादृष्टीने अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीनंतर अमेरिकने मोदींविरोधी धोरण स्वीकारले होते. २००५ साली अमेरिकेने मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता. तेव्हापासूनच मोदींना अमेरिकेत प्रवेशास परवानगी नव्हती. मात्र आता नॅन्सी पॉवेल यांच्या भेटीनंतर मोदींना व्हिसा देण्यावरील बंदी उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमेरिका व भारत यांच्यातील संबंधांवर भर देण्याच्या हेतूने भारतातील ज्येष्ठ नेते व उद्योगपती यांच्यापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2014 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close