S M L

राहुल गांधींची साखर पेरणी जोरात

4 मार्च, कागलप्रताप नाईक, नंदकुमार कांबळे उत्तरप्रदेश,बिहार आणि ओरीसा सारख्या अनेक राज्यात प्राथमिक शिक्षण चांगलं मिळत नाही, कारण शिक्षकांचा दर्जा चांगला नाही असं राहुल गांधी यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये ते बोलत होते. तिथल्या साखरकारखान्याला तसंच जयसिंगराव घाटगे विद्यामंदीरला त्यांनी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली.राहुल गांधी यांनी छत्रपती साखर कारखान्याला भेट दिल्यानंतर श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदीरला भेट दिली. विद्यार्थांशी गप्पा मारल्यानंतर राहुल गांधी मुलांमध्ये जावून बसले आणि मुलांचा अभ्यास,त्यांची घरची परिस्थिती यासगळ्याची विचारपूस केली. कोणत्याच कामाला तुच्छ लेखू नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थांना दिला. त्याचबरोबर विद्यार्थांशी गप्पा मारल्या आणि विद्यार्थांना प्रश्नही विचारायला सांगितले.पुण्यात भोवळ येऊन पडलेल्या महिलेला राहुलबाबानं आई म्हणून पाणी दिलं. 'आई आपको लगा तो नही ना, लिजीये पानी पिजीये'.., हे बोल आहेत अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींचे. पुण्यात काँग्रेस भवनात काल राहुल गेले होते. बचतगटांच्या प्रदर्शनाला तिथं त्यांनी भेट दिली. मालती भोर यांचाही स्टॉल तिथं होता. यावेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याचा धक्का लागून मालती भोर पडल्या. त्यांना चक्कर आली. ते समजताच गाडीत बसलेले राहुल गांधी खाली उतरले. मालती भोर यांना पाणी दिलं. त्यांची आस्थेनं विचारपूस केली. तेव्हा मालती भोर यांना अक्षरश: गहिवरून आलं. पुण्यात भोवळ येऊन पडलेल्या महिलेला राहुलबाबानं आई म्हणून पाणी दिलं आणि कोल्हापूरच्या शाळेला भेट देऊन राहुलबाबानं भविष्यातल्या मतदारांशी हितगुज साधलं. एकूणच साखरकारखान्यांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींनी यानिमित्तानं साखर पेरण्याचं काम मात्र इमानेइतबारे केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2009 05:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close