S M L

'आप' विरोधात भाजप उतरणार रस्त्यावर

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2014 09:44 PM IST

'आप' विरोधात भाजप उतरणार रस्त्यावर

87675 harsh vardhanz_kejri15 फेब्रुवारी : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नव्या इनिंगला सुरूवात केली. पण त्यांच्या राजीनाम्याच्या खेळीवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 18 फेब्रुवारीला आम आदमी पार्टी विरोधात भाजप दिल्लीत धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप नेते विजय गोयल यांनी दिली आहे.

आप कितीही आमचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असं सांगत असले तरी राष्ट्रकुल घोटाळ्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये एकाही काँग्रेस नेत्यांचे नावं नाही. त्यामुळे आपचा भ्रष्टाचाराविरोधात लढ्याचा दावा हा सपेशल खोटा आहे असा दावा गोयल यांनी केला.

तसंच केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाचा मुद्दा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरला असाही आरोप गोयल यांनी केला. शुक्रवारी विधानसभेत जनलोकपाल विधेयक सादर करण्यात अपयश आल्यामुळे केजरीवाल यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांनी भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली असा आरोपही केला होता. त्यामुळे भाजपने आपविरोधात आक्रमक पवित्रा घेत आता रस्त्यावर उतरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2014 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close