S M L

माझे आयुष्य देशासाठी समर्पित - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 16, 2014 04:36 PM IST

माझे आयुष्य देशासाठी समर्पित - मोदी

modi_rally_himachal_360x270_4416 फेब्रुवारी :  मला कोणासाठीही संपत्ती कमवायची नाही. माझ्या मागे-पुढे कोणी नाही, असे सांगत स्मित हास्य करीत, परदेशातील काळे धन परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माझे आयुष्य देशासाठी समर्पीत असल्याचे ते म्हणाले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. मात्र, 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गॅसच्या वाढत्या किंमतीवर मौन सोडण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर दिलेले नाही. मोदी हिमाचल प्रदेशमधील सुजानपूर येथील परिवर्तन रॅलीला संबोधीत करीत आहेत.

युपीए सरकारने सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांमध्ये महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याचा त्यांना सपशेल विसर पडला आहे, असं मोदी म्हणाले .  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, काँग्रेसचे नेते सध्या देशभरात सभा घेत आहेत. त्या सभांमधून त्यांना भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि अकबराची आठवण होत आहे. मात्र, महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला ते विसरले आहेत, असंही ते म्हणाले.

पर्यटन विकास गरजेचा 

हिमाचल प्रदेशातील पर्यटनावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे व्यक्त करीत काँग्रेस सरकारने येथे रेल्वेचे जाळे विणले नसल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय मागे राहिला असल्याचा आरोप केला. इन्क्रिडेबल इंडियाची जाहीरात करुन पर्यटक येत नसतात असा हल्ला त्यांनी केला.

हिमाचलमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला तर येथील तरुणांना हिमाचलमध्येच रोजगार मिळेल. त्यांना आपला प्रदेश सोडावा लागणार नाही. त्यामुळे येथेच रोजगार वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भ्रष्टाचारावर बोलले मोदी

पंतप्रधान म्हणतात, पैसे झाडावर उगवत नाही. पंतप्रधान महोदय तुमच्या पक्षाचे नेते वीरभद्रजी काही वर्षांमध्येच त्यांची संपत्ती चौदा पटींनी वाढली आहे. हे कसे झाले?

परदेशातील काळेधन भारतात परत आणण्यात काँग्रेसला काय अडचण येत आहे, असा सवाल करत मोदी म्हणाले, त्यांचाच (काँग्रेस) पैसा परदेशातील बँकामध्ये जमा आहे. काळ्या धनावर देशातील गरीबांचा हक्क आहे. तो पैसा आम्ही देशात परत आणू आणि सरकारी कर्मचा-यांना बक्षीसाच्या रुपाने देऊ असं मोदी म्हणाले.

हे देशातील पहिले सरकार आहे, ज्यावर कोणालाच विश्वास नाही. देशातील सैनिकांना सरकारवर विश्वास नाही, शेतक-यांना विश्वास नाही आणि तरुणांनाही सरकारवर विश्वास उरलेला नाही. काही लोकांसाठी राजकारण हा व्यवसाय आहे, मात्र आमच्यासाठी ही राष्ट्रभक्ती असल्याचं ही मोदी म्हणाले.

शरद पावारांची ही केली पाठराखण

दरम्यान, मला कुठल्या पक्षाचा नेते नुसता भेटला तरी त्याच्यावर टीका होते. हे लोकशाहीत योग्य नाही असं म्हणत मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तल्या भेटीला अप्रत्येक्ष पणे दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2014 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close