S M L

राजीव गांधींच्या सर्व सात मारेकर्‍यांची होणार सुटका

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2014 01:33 PM IST

rajiv gandhi19 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व मारेकर्‍यांची तुरूंगातून सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी घेतला आहे. त्यामुळे संथन, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट, जयकुमार, आणि रवीचंद्रन या सात मारेकर्‍यांची होणार सुटका तुरूंगातून सुटका होणार आहे.

आज सकाळी तामिळनाडूच्या कॅबिनेटची एक बैठक झाली आणि त्यामध्ये या मारेकर्‍यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं जयललिता यांनी तामिळनाडू विधानसभेमध्ये जाहीर केले. मात्र तामिळनाडू सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय गृहखात्यानं नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर तामिळनाडू सरकारनं या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यासाठी केंद्राला 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. जर तीन दिवसांमध्ये केंद्र सरकारनं प्रतिक्रिया दिली नाही, तर राज्य सरकार या मारेकर्‍यांची सुटका करणार आहे.

सुप्रीम कोर्टाने काल (मंगळवारी) राजीव गांधींच्या तीन मारेकरांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर आज, (बुधवारी )मुख्यमंत्री जयललिता यांनी त्या तिघांनसह इतर ही चार मारेकर्‍यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजीव गांधी हत्याकांड खटला

 • 21 मे 1991          राजीव गांधींची हत्या, हत्येचा संशय श्रीलंकास्थित लिट्टेवर
 • 21 मे 1991          राजीव गांधींची हत्या, हत्येचा संशय श्रीलंकास्थित लिट्टेवर
 • जून 1991 -         नलिनी, भाग्यनाथन, पद्म या आरोपींना अटक
 • 20 मे 1992        सीबीआयच्या विशेष तपास पथकाचं विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल
 • नोव्हेंबर 1993     विशेष कोर्टानं 26 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले
 • जानेवारी 1994    खटल्याला सुरुवात, खटला इन कॅमेरा चालवला गेला
 • मे 1997              288  साक्षीदारांची साक्ष संपली
 • जानेवारी 1998    विशेष कोर्टानं 26 आरोपींना सुनावली फाशी
 • मे 1998               सुप्रीम कोर्टाची 26 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती
 • सप्टेंबर 1998      सुप्रीम कोर्टात 26 आरोपींच्या अर्जावर सुनावणी सुरू
 • 11 मे 1999          सुप्रीम कोर्टानं नलिनी, संथन, मुरुगन आणि पेरारिवलन यांची शिक्षा कायम ठेवली
 • 11 मे 1999          सुप्रीम कोर्टानं रॉबर्ट पायस, जयकुमार, रविचंद्रन यांची फाशी रद्द करून जन्मठेप सुनावली, इतर आरोपींची सुटका
 • 2000                  नलिनीची मुलगी लहान असल्यानं तिच्यावर दया दाखवून तिची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप सुनावली
 • 11 ऑगस्ट 2006  राष्ट्रपतींनी संथन, मुरुगन आणि पेरारिवलन यांची दयायाचिका फेटाळली
 • 18 फेब्रुवारी 2014   सुप्रीम कोर्टाकडून तिघांची शिक्षा रद्द, जन्मठेपेत रुपांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2014 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close