S M L

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा कायम

7 मार्च काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. काल दिल्लीत झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघू शकलेला नाही. 7 ते 8 जागांबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. पण हा प्रश्न काही सुटलेला नाही. त्याआधी काल काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपापल्या अंतर्गत बैठका घेतल्या. काँग्रेसची बैठक सोनिया गांधींच्या घरी झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या घरी झाली. राज्यातला जागांचा घोळ सुटला नसतानाच राष्ट्रवादीनं महाराष्ट्राबाहेर गुजरात आणि गोव्यामध्ये जागा मागितल्यायत. दरम्यान, महाराष्ट्रातल्या पहिल्या मतदानाची तारीख जवळ येत असल्यामुळे दोन ते तीन दिवसांत जागावाटपाबद्दल निर्णय घ्यावा, असे निर्देश सोनिया गांधींनी दिल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2009 11:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2009 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close