S M L

राज्यसभेत तेलंगणा विधेयक सादर

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2014 07:05 PM IST

rajya-sabha2-pti20 फेब्रुवारी : लोकसभेत तेलगंणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाची कसोटी लागलीय. संसदेचं अधिवेशन संपायला केवळ एकच दिवस उरलाय. मात्र, तेलंगणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत पुन्हा गोंधळ सुरू आहे. सकाळपासून विरोधकांनी एकच गोंधळ घातलाय. अखेर तीन वाजता गदारोळातच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयक सादर केलंय पण गदारोळामुळे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलंय.

आज स्वतंत्र तेलंगणाचं विधेयक मंजूर व्हावं यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय. राज्यसभेत विधेयक चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असं राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी आधीच स्पष्ट केलंय. मात्र गोंधळामुळे राज्यसभा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीये.

तर दुसरीकडे विधेयकामधल्या सुधारणांवरून काँग्रेस आणि युपीएमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. सरकारी सुत्रांनुसार हे एक सर्वसाधारण विधेयक आहे आणि त्यामुळे यात सुधारणा करण्याचा प्रश्नच नाही. ते मंजूर होईल किंवा फेटाळलं जाऊ शकतं, त्यामध्ये सुधारणांचा प्रश्नच नाही, असं सरकारचं म्हणणं असल्याचं सरकारी सुत्रांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या कामकाजाचे अनेक दिवस वाया गेले आहे. त्यामुळे महत्त्वाची विधेयकं रखडलीत. ती मंजूर करून घेण्यासाठी सरकार अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा विचार करू शकते. संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी त्यासंबंधी संकेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2014 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close