S M L

संसद अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2014 12:20 PM IST

संसद अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

A view of the Indian parliament building is seen in New Delhi21 फेब्रुवारी :  संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यानंतर पुढचं अधिवेशन लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच भरेल. या अधिवेशनात तेलंगणाच्या मुद्द्यावरून बरंच रणकंदन झाल्यानं कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. त्यामुळे यूपीएसाठी महत्त्वाची असलेली, विशेषतः काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आग्रह धरलेली 6 भ्रष्टाचारविरोधी विधेयकं मंजूर करून घेण्यात सरकारला यश आलेलं नाही.

निवडणूक प्रचारात याच विधेयकांवर भर देण्याची रणनिती राहुल गांधी यांनी आखलेली आहे, त्यामुळे ही विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र, त्यासाठी भाजपनं हवी तशी साथ दिली नसल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. मात्र, भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी राहुलना खूप उशिरा जाग आली असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय.

कोणकोणती भ्रष्टाचारविरोधी विधेयकं आहेत?

  • व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक, 2011
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक
  • परदेशी सार्वजनिक अधिकारी लाच प्रतिबंधक विधेयक, 2011
  • नागरिकांना ठराविक वेळेत माल आणि सेवा मिळण्याचा हक्क विधेयक, 2011
  • सार्वजनिक खरेदी विधेयक, 2011
  • न्यायालयीन मानक आणि दायित्व विधेयक, 2010

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावलीये. या बैठकीसाठी वरिष्ठ नेत्यांना बोलावण्यात आलंय. या बैठकीत राहुल गांधी काँग्रेसचा जाहीरनामा आणि प्रचार तंत्र यावर चर्चा करण्याची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close