S M L

मुकेश अंबानीच्या एका खिशात मोदी तर दुसर्‍यात राहुल- केजरीवाल

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2014 10:21 AM IST

Image img_223032_kejriwal_240x180.jpg23 फेब्रुवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार सभांचा खर्च उद्योगपती मुकेश अंबानी उचलतात. त्यांना हेलिकॉफ्टर पुरवतात. अंबानीच्या एका खिशात मोदी तर दुसर्‍या खिशात राहुल गांधी आहेत, असा जोरदार प्रहार आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ही पहिलीच प्रचार सभा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा बिगून या सभेतून वाजणार आहे. आम आदमी पक्ष हरियाणात लोकसभेच्या 10 तर विधानसभेच्या 90 जागा लढविणार आहे.

नरेंद्र मोदी यांना हेलिकॉफ्टर कोण पुरवतो? अंबानी यांनी दिलेल्या हेलिकॉफ्टरच्या शेजारी मोदी उभे असल्याचे माझ्याजवळ छायाचित्र आहे. मोदी म्हणतात ते चहा विकणारे होते. एखाद्या चहा विकणाऱ्याकडे एवढे हेलिकॉप्टर कसे काय राहू शकतात. मी अंबानींच्या स्विस बॅंक अकाऊंटचे क्रमांक जाहीर केले आहेत. नरेंद्र मोदी काळा पैसा भारतात आणण्याच्या बाता मारतात. अंबानी यांच्या खात्यातून ते पैसे परत आणतील का? असा सवाल मोदींना लक्ष करत केजरीवाल यांनी केला.

हरियाणाचे मुख्यमंत्री हुड्डा प्रॉपर्टी डिलर आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून रॉबर्ट वढेरा, डिएलएफ, रिलायंस या कंपन्यांना दिल्या जात आहेत. मुकेश अंबानीला केंद्र सरकार प्रतिवर्ष 54 हजार कोटी रुपये देत आहे. त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. मोदी किंवा राहुल कुणीही सत्तेवर आले तरी अंबानीच देश चालविणार आहेत असंही  केजरीवाल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2014 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close