S M L

लालूंचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'फत्ते, 9 आमदार परतले

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2014 06:33 PM IST

लालूंचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'फत्ते, 9 आमदार परतले

lalu new25 फेब्रुवारी : राष्ट्रीय जनता दलामध्ये फूट पडल्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली त्यात त्यांना बर्‍यापैकी यश आलंय. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर 9 आमदारांची परेड घडवून आणली.

लालूंच्या पक्षातले आमदार नितिशकुमार यांच्या जेडीयुमध्ये जाण्याची शक्यता आहे. या पाश्‍र्वभूमीवर लालूंनी ही परेड केली. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पास्वान यांचा मुलगा चिराग पासवान याने बिहारमध्ये भाजपसोबत जाण्याची शक्यता फेटाळलेली नाही. लालूप्रसाद यादव याबद्दल आपल्या वडिलांसोबत चर्चा करू शकतात, असं चिराग पासवान याने म्हटलं आहे. पण पास्वान यांच्याशी आपला संपर्कच होऊ शकत नाही असं लालूंनी स्पष्ट केलंय.

 आज (मंगळवारी) सकाळी आपल्या पार्टीत झालेल्या बंडखोरीमागे नितीश कुमार असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केलाय. आरजेडीच्या 13 आमदारांनी आपण पार्टीशी फारकत घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यातल्या 6 आमदारांनी आपल्या खोट्या सह्या करण्यात आल्याचा दावा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातले आणखीन 3 आमदार आरजेडीमध्ये परतण्याची शक्यता आहे. आपण आपले सगळे 22 आमदार आज पत्रकारांच्या समोर हजर करू असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केले होतं त्यानुसार लालू यांनी संध्याकाळी 13 तर नाही पण 9 आमदारांची परेड घडवून आणली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2014 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close