S M L

नरेंद्र मोदी 'नपुंसक'- सलमान खुर्शिद

Samruddha Bhambure | Updated On: Feb 26, 2014 02:57 PM IST

नरेंद्र मोदी 'नपुंसक'- सलमान खुर्शिद

khurshid modi26 फेब्रुवारी :  निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका होतच असते, पण त्यामध्ये किमान सभ्यता राखणे आवश्यक असते, हे भान हल्ली अनेक राजकीय पक्ष विसरलेले दिसतात. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनीही सभ्यतेची मर्यादा ओलांडत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांना 'नपुंसक' असे म्हटले. खुर्शीद हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या खुर्शीदाबाद इथं प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी भाजपनं यावर टीका केली आहे.

'गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगील रोखण्यात अपयशी ठरलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 'नपुंसक' आहेत, अशी जहरी टीका काँग्रेस नेते व केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केली आहे.

भाजपने या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस निराश झाल्यानेच अशी टीका करत असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील फारूखाबाद येथे झालेल्या सभेत बोलताना सलमान खुर्शिद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

खुर्शिद म्हणाले, ''देशातील जनता असा दावा करत आहे, की देशाचा पंतप्रधान हा मजबूत व शक्तिशाली असावा. पण, तुम्ही गोध्रामधील नागरिकांची सुरक्षा करू शकत नाही. काही लोक येतात, हल्ला करून जातात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या अर्थाने शक्तिशाली व्यक्ती म्हणायचे? तुम्ही नागरिकांची हत्या केली, असा आमचा आरोप नाही. पण, तुम्ही 'नपुंसक' आहात.''

काँग्रेसच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते जय नारायण व्यास म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निराशेच्या वृत्तीतून काँग्रेसने अशी टीका केली आहे. आमच्या जीभेवर अद्याप संयम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close