S M L

रामविलास पासवान भाजपच्या उंबरठ्यावर

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2014 03:39 PM IST

रामविलास पासवान भाजपच्या उंबरठ्यावर

ram vilas paswan26 फेब्रुवारी : देशभरात भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची लाट दिसत असून आता या लाटेत लोकजनशक्ती पक्ष स्वार होणार आहे. रामविलास पासवान यांनी अखेर भाजपशी युती करणार, हे जवळपास निश्चित झालंय. लोकजनशक्ती पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक झाली.

पण, भाजपबरोबर युतीची स्पष्ट घोषणा करण्यात आली नसली. तरी तसे स्पष्ट संकेत पासवान यांनी दिले आहे. आरजेडीबरोबर गेले अनेक दिवस मतभेद आहेत आणि काँग्रेसही प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे आमच्यासमोर कुठलाच पर्याय उरलेला नाही, असं रामविलास पासवान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

यासंदर्भात रामविलास पासवान लवकरच अधिकृत घोषणा करतील. रामविलास पासवान उद्या (गुरुवारी) दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपनं लोक जनशक्ती पक्षाला 8 जागा देण्याची तयारी दाखवलीय. त्यामुळे गेले अनेक दिवस जी चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरलीय. रामविलास पासवान यांनी लालूंची साथ सोडत आपला जुना सोबती असलेल्या भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. 2002 च्या गुजरात दंगलींनंतर रामविलास पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close