S M L

खुर्शिदांची भाषा योग्य नाही - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 27, 2014 02:12 PM IST

rahul gandhi delhi pc3127 फेब्रुवारी :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये झालेल्या दंगली रोखण्यात अपयशी ठरलेले मोदी हे ‘नपुंसक’ आहेत, अशी जळजळीत टीका सलमान खुर्शीद यांनी केली होती. उत्तरप्रदेशातील फारूखाबादमध्ये झालेल्या सभेत खुर्शीद यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतरही खुर्शिद यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते.

देशातील जनतेच्या दाव्यानुसार देशाचा पंतप्रधान हा बळकट आणि शक्तिशाली असावा, पण गोध्रामधील नागरिकांची तुम्ही सुरक्षा करू शकत नाही. काही जण येतात, हल्ला करून जातात आणि तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या अर्थाने शक्तिशाली म्हणायचे? जातीय दंगलीतील मृत्युमुखी पडलेल्यांना तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही 'नपुंसक' आहात, असे त्यांनी म्हटले होते.

खुर्शिद यांच्या वक्तव्याविषयी नाराजी वक्त करत राहुल गांधी म्हणाले, खुर्शिद यांनी वापरलेली अशा पद्धतीची भाषा योग्य नाही. त्यांचे हे वक्तव मला पटलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2014 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close