S M L

अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2014 06:41 PM IST

अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

56n_athani_news27 फेब्रुवारी : देशभरात मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे पण अंधश्रद्धेनं बुरसटलेल्या एका मांत्रिकांने मुलीचा पुर्नजन्म होईल असं सांगत एका 12 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यामध्ये ही घटना घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार हाणून पाडण्यात आला. मांत्रिकासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

अथणी तालुक्यातल्या झुंजवाड गावामध्ये एक मठ आहे. या मठात सदाशिव निमगौडा उर्फ अप्पय्या स्वामी हा मांत्रिक गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रमंत्र करत होता. त्याने या भागातल्या अनेक नागरिकांना यापूर्वीही फसवलंय. गेल्या 2 फेब्रुवारीला या मांत्रिकाने 4 ते 5 लहान मुलांना या मठात आणलं होतं.

आज महाशिवरात्री असल्यानं चमत्कार दाखवतो असं सांगत या मांत्रिकाने एका 12 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी बागलकोट जिल्ह्यातल्या जमखंडी तालुक्यातील आहे. गेल्या 4 दिवसांपासून या मुलीला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं. आणि मध्यरात्री या खोलीला आग लावून त्या मुलीला जाळण्यात येणार होतं. मात्र या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली आणि वेळीच पोलिसांनी मठात धाड टाकून हा प्रकार थांबवला. याप्रकरणी मांत्रिकासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलीय. या भोंदुबाबानं 2006 साली 30 दिवस पाण्यात राहण्याचं एक नाटकही केलं होतं. तसंच जादूटोणा करुन तो नागरिकांना लुबाडही होता. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईने आता या भोंदुबाबाचा पर्दाफाश झालाय.

कोण आहे हा भोंदू?

 • - सदाशिव उर्फ अप्पय्या स्वामी हा कुख्यात बाबा
 • - बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यात अप्पय्या बाबाचं प्रस्थ
 • - झुंजारवाड गावात 'चंद्रगिरी' नावाचा मठ चालवतो
 • - मठाचे संपूर्ण बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आता उघड
 • - बेळगाव जिल्ह्यात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी अप्पय्या बदनाम
 • - गुरुपद गौडा पाटील या विश्वासू सहकार्‍याची अप्पय्याला साथ
 • - अप्पय्यावर बलात्काराचे आरोप, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
 • - 2010 साली आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक
 • - अप्पय्याने माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर स्वतःचे कपडे काढले होते

कर्नाटक : जादूटोणाविरोधी विधेयक

 • - कर्नाटकमध्ये जादूटोणाविरोधी कायदा करण्यासाठी सरकार इच्छुक आहे
 • - जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदाही कर्नाटक सरकारने तयार केलाय
 • - या कायद्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कायदा मंत्री यांनी पुण्यात येऊन अंनिसशी चर्चाही केलीय
 • - कर्नाटकच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या मसुद्यात एकूण 27 कलमं आहेत
 • - महाराष्ट्राच्या कायद्यापेक्षाही हा कायदा कठोर आहे
 • - पण, कर्नाटकातही भाजपनंही या विधेयकाला विरोध केलाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2014 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close