S M L

अखेर काँग्रेसचा 'हात' सोडून पासवान भाजपमध्ये दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2014 11:05 PM IST

अखेर काँग्रेसचा 'हात' सोडून पासवान भाजपमध्ये दाखल

paswan in bjp27 फेब्रुवारी : अखेर 'काँग्रेस'चा हात सोडून रामविलास पासवान भाजपमध्ये दाखल झाले आहे. बिहारमध्ये भाजप आणि रामविलास पासवान यांच्या लोकजन शक्ती पार्टीची युती झाल्याची घोषणा भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेला सुरूवात झाली होती. खुद्द रामविलास पासवान यांनीच याबद्दल संकेत दिले होते. पण यासाठी काँग्रेसला दोन दिवसांचा वेळही त्यांनी दिला होता.

पण काँग्रेसकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या रामविलास पासवान यांनी आज (गुरुवारी) संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यानंतर राजनाथ सिंह आणि रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं लोक जनशक्ती पक्षाला बिहारमधल्या 7 जागा दिल्या आहेत. पासवान यांच्या एनडीए प्रवेशामुळे काँग्रेस-आरजेडी आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2002 च्या गुजरात दंगलींनंतर रामविलास पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.देशभरात मोदींची लाट दिसून येत आहे पासवान यांनी वार्‍याचा वेध घेत पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2014 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close