S M L

सुब्रतो रॉय यांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 28, 2014 04:13 PM IST

सुब्रतो रॉय यांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

sahara_parivaar_301028 फेब्रुवारी : सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना लखनौ येथील निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 4 मार्चला सुप्रीम कोर्टात होणार आहे.

याआधी सुब्रतो रॉय यांना अटक करण्यासाठी लखनौ येथील निवासस्थानी गेलेले पोलिस रिकाम्या हातांनी परत आल्यानंतर रॉय यांनी आज (शुक्रवार) 'मी फरार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे कोणत्याची परिस्थिती पालन करण्याची माझी तयारी आहे' असं म्हटलं होतं.

"आपली आई अत्यंत आजारी असल्याने 3 मार्चपर्यंत आपल्या घरीच कैदेत राहु देण्याची परवानगी देण्यात यावी,' अशी विनंती रॉय यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयास केली होती. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यास आजही न्यायालयामध्ये हजर राहण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. पण सुप्रीम कोर्टाने सुब्रतो राय यांची विनंती फेटाळली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 26 फेब्रुवारी रोजी रॉय यांना 4 मार्चपूर्वी न्यायालयासमोर हजर केले जावे, असे आदेश दिले होते. सहारा उद्योगसमूहावर आपल्या गुंतवणूकदारांचे 20हजार कोटींचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना अटक करण्यासाठी अजामिनपात्र अटक वॉरंट काढला आहे. त्याला काल रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

4 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे आश्वासनही रॉय यांनी दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी रॉय यांना अटक करून 4 मार्च रोजी न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

सहारा घोटाळा

 • नोव्हेंबर 2010: सेबीनं सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांना फंड गोळा कऱण्याची परवानगी नाकारलीडिसेंबर 2010: सहारा विरुद्ध सेबी खटल्यात अलाहाबाद हायकोर्टाची स्थगिती
 • जानेवारी 2011: सेबीनं गुंतवूणकदारांना सावधगिरीच्या सूचना देणारी जाहिरात प्रसिद्ध केली
 • एप्रिल 2011: अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्थगिती उठवली. सहारा ग्‌ुप वरच्या कोर्टात दाखल
 • मे 2011 : साहार घोटाळाप्रकऱणी अधिक चौकशी करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सेबीला परवानगी
 • जून 2011: सेबीनं संबंधित दोन्ही कंपन्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले
 • जुलै 2011: सेबीला असे अधिकार नसल्याचा दावा करत सहाराची सर्वोच्च न्यायालयात अपील
 • जूलै 2011: Securities Appellate Tribunal कडे अपील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सहाराला निर्देश
 • ऑक्टोबर 2011: Securities Appellate Tribunal ची सेबीच्या आदेशांवर रोक
 • जानेवारी 2012: संपत्ती आणि रोख्यांची सहाला ग्‌ुपने माहिती द्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे सहाराला आदेश
 • ऑगस्ट 2012: गुतवणूकदारांचे पैसे परत कऱण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सहाराला आदेश
 • फेब्रूवारी 6, 2013: सर्वोच्च नाय्यालयाची सहाराला नोटीस
 • फेब्रूवारी 13, 2013: सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन या कपंन्यांची सर्व खाती गोठविण्याचे सेबीचे आदेश
 • नोव्हेंबर 21, 2013: सुब्रतो राय यांना देशाबाहेर जाण्यास मनाी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कंपनीची संपत्ती विकण्यावरही प्रतिबंध
 • फेब्रूवारी 20, 2014: सुब्रतो राय यांना कोर्टात हजर रहाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
 • फेब्रूवारी 26, 2014: सुब्रतो राय यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2014 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close