S M L

आज मोदी-मुलायम-केजरीवाल उत्तर प्रदेशमध्ये

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2014 02:20 PM IST

आज मोदी-मुलायम-केजरीवाल उत्तर प्रदेशमध्ये

modi-mullu-kejri02 मार्च :  लोकसभेच्या दृष्टीन सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. याच राज्याने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत. लोकसभेच्या सर्वाधिक जागा याच राज्यात आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सभा-रॅली-रोड शो करीत आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी लखनऊच्या रमाबाई नगर येथे विजय शंखनाद रॅलीला संबोधित करणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायसिंह यादव अलाहाबादमध्ये 'देश बनओ-देश बचाओ' रॅलीच्या माध्यमातून जनतेला थर्ड फ्रंटसोबत जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तर, नव्या पद्धतीचे राजकारण करत असल्याचा दावा करणारे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची कानपूरमध्ये सभा होणार आहे. ते शनिवारपासून तीन दिवसांच्या उत्तरप्रदेश दौर्‍यावर निघाले आहेत. उत्तरप्रदेशमधील 80 लोकसभा मतदारसंघावर आपलाच झेंडा फडकावा अशी अपेक्षा ठेवून प्रचाराला निघालेले हे नेते आज जनतेला काय आश्वासन देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2014 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close