S M L

सुब्रतो रॉय यांची तिहार जेलमध्ये रवानगी

Sachin Salve | Updated On: Mar 4, 2014 05:41 PM IST

सुब्रतो रॉय यांची तिहार जेलमध्ये रवानगी

subroto roy04 मार्च :  कोर्टात गैरहजर राहून अवमान केल्याबद्दल सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. पण सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना फटकारलं असून रॉय यांनी पोलीस कोठडीत रवानगी केलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे तोपर्यंत रॉय यांना दिल्ली पोलिसांच्या कोठडीत राहावे लागणार आहे. सुब्रतो रॉय आणि सहाराच्या दोन संचालकांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी थकवल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना वारंवार कोर्टाने हजर राहण्यात बाबत नोटीस बजावली. पण रॉय यांनी कोर्टाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली. अखेर कोर्टाने 28 फेब्रुवारीला सुब्रतो रॉय यांच्याविरोधात कोर्टाने अजामिनपात्र अटकवॉरंट जारी केलं. पाच दिवसांच्या तुरुंगवारी नंतर आज (मंगळवारी) कोर्टात सुनावणी झाली.

सुब्रतो रॉय यांनी हात जोडून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली असून माझ्या 12 लाख कर्मचार्‍यांचा विचार करा अशी विनवणी कोर्टात केली तसंच दोन महिन्यात देणेकरांचे पैसे परत करू अशी ग्वाहीही रॉय यांनी दिली. पण कोर्टाने सुब्रतो रॉय यांचा विनंतीचा विचार करू पण सुब्रतो रॉय यांनी कोर्टाचा मान राखला नाही, अशा शब्दांत कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करू, असा प्रस्ताव सुब्रतो रॉय यांनी कोर्टाकडे दिला. पण कोर्टाने हा प्रस्ताव नाकारला.

पैसे परत करण्याबाबत नवा प्रस्ताव सादर करेपर्यंत सुब्रतो रॉय आणि सहारा समूहाचे दोन संचालक पोलीस कोठडीतच राहणार आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे. दरम्यान, सुब्रतो रॉय यांच्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात एका व्यक्तीने शाई फेकली. रॉय यांच्याविरूद्ध घोषणा देत या व्यक्तीनं शाई फेकली. रॉय हे कोर्टात हजर राहण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. मनोज शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. आपण वकील आहोत असा दावा त्यानं केलाय. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2014 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close