S M L

लोकसभेचे बिगुल वाजले, 7 एप्रिल ते 12 मे पर्यंत निवडणुका!

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2014 09:52 PM IST

election voting05 मार्च : देशातील आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने आज सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता लागू झाली.

7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत एकूण 9 टप्प्यांमध्ये मतदान घेतलं जाणार आहे. 16 मे ला देशातील सर्व 545 मतदारसंघात मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 10, 17 आणि 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. याचवेळी निवडणूक आयोगाने तेलंगणा, सीमाध्रं, ओडिशा, सिक्कीम या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. यंदा प्रथमच सर्वाधिक 81.4 कोटी मतदार मतदानाचा हक्क  बजावणार आहेत. देशातील हवामान व पावसाचा अंदाज घेऊनच वेळापत्रक तयार केल्याचे निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त पी. व्ही संपत यांनी सांगितले.

सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मे 2014 पूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणुक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल.  तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे.  याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा हा आकडा 10 कोटींनी जास्त आहे. देशभरात 9 लाख 30 हजार मतदान केंद्र उभारण्यात येतील, या लोकसभा निवडणुकीत 'NOTA' (‘वरीलपैकी कुणीही नाही’)चा पर्याय उपलब्ध असेल. त्याशिवा यादीत नाव नसल्यास/गहाळ असल्यास पुन्हा मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर फॉर्म मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त पी. व्ही संपत यांनी दिली.

2009 मध्ये 15 व्या लोकसभा निवडणुकांसाठी 16 एप्रिल ते 13 मे या काळात पाच टप्प्यात मतदान करण्‍यात आले होते.

यंदा प्रथमच नऊ टप्प्यात मतदान होत आहे.

पहिला टप्पा- 7 एप्रिल

दुसरा टप्पा- 9 एप्रिल

तिसरा टप्पा- 10 एप्रिल

चौथा टप्पा- 12 एप्रिल

पाचवा टप्पा- 17 एप्रिल 

सहावा टप्पा- 24 एप्रिल

सातवा टप्पा- 30 एप्रिल

आठवा टप्पा- 7 मे

नववा टप्पा- 12 मे

महाराष्ट्रात तीन टप्प्यांत होणार निवडणूका

  • पहिला टप्पा-  10 एप्रिलला विदर्भाच्या 10 मतदारसंघांमध्ये मतदान होणार
  • दुसरा टप्पा -   17 एप्रिलला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 19 मतदारसंघांमध्ये मतदान होणार
  • तिसरा टप्पा-  24 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमधल्या 19 मतदारसंघांमध्ये मतदान होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2014 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close