S M L

दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर 'आप'चा राडा

Sachin Salve | Updated On: Mar 5, 2014 07:20 PM IST

दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर 'आप'चा राडा

2346236delhi aap bjp05 मार्च : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची गुजरातमध्ये चौकशी केल्याबद्दल 'आप'च्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत निदर्शनं केलं. आम आदमी पार्टी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारावे लागले. या निदर्शनांदरम्यान दगडफेकीच्या घटनाही घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलेलं नव्हतं, असं स्पष्टीकरण गुजरात पोलिसांनी दिलंय. आचारसंहिता लागू झाल्यामुळे रोड शो किंवा सभेसाठी जिल्हा पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे पोलीस याबद्दलची तपासणी करत होते, असं गुजरात पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर आता आंदोलक पांगले आहे आणि कार्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2014 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close