S M L

मोदींच्या दारावर केजरीवालांचा राडा !

Samruddha Bhambure | Updated On: Mar 7, 2014 05:02 PM IST

मोदींच्या दारावर केजरीवालांचा राडा !

kejirwal_ahdabad21_338x22507 मार्च : 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) आपण गुजरातमध्ये जे काही पाहिलं त्याविषयी चर्चा करायला मी  नरेंद्र मोदींच्या घरी जाणार असल्याचे जाहीर केलं. पण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवालांना भेटायला नकार दिला आहे.

अरविंद केजरीवाल मोदी यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी जात अस्ताना अहमदाबाद पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवलं. मोदींना भेटण्याची पूर्वपरवानगी केजरीवालांकडे आहे का याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना आडवलं  होतं.

मोदींच्या भेटीची वेळ घेण्यासाठी मनीष सिसोदिया जात होते. पण मोदींनी या भेटीला नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल आता अहमदबाद एअरपोर्टच्या दिशेने निघाले. तर अशी घोषणा करण्याच्या आधी केजरीवाल यांनी आधी मोदींच्या भेटीची वेळ का घेतली नाही, असा सवाल भाजपनं केला.

दरम्यान, 'गुजरातच्या विकासासंदर्भात आत्तापर्यंत खूप चर्चा झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत आम्ही याच्या नेमके उलटे चित्र पाहिले आहे. गुजरातमध्ये जे सांगितले जात आहे त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती आहे. आम्ही मोदी यांच्या निवासस्थानी आत्ताच जाऊन त्यांची भेट घेणार आहोत व त्यांना यासंदर्भात 16 प्रश्‍न विचारणार आहोत,' असे केजरीवाल यांनी सांगितले.

'गुजरात भ्रष्टाचार मुक्त राज्य आहे असा मोदी दावा करतात पण गुजरातमधील बहुसंख्य जनता गुजरात मध्ये असलेल्या भ्रष्टाचाराविषयी बोलतेय, मग मोदी भ्रष्टाचारमुक्त गुजरात हा दावा कुठल्या आधारावर करतायत,' असा सवाल असे केजरीवाल यांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2014 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close