S M L

योगेंद्र यादव यांच्यावर शाईफेक

Sachin Salve | Updated On: Mar 8, 2014 10:29 PM IST

योगेंद्र यादव यांच्यावर शाईफेक

योगेंद्र यादव यांना शाई फासली

योगेंद्र यादव यांना शाई फासली

08 मार्च : आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांना काळी शाई फासल्याची घटना घडली. दिल्लीत जंतरमंतर मैदानावर महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमात योगेंद्र यादव हजर होते. यावेळी योगेंद्र यादव प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत असताना पाठीमागून आलेलल्या एका व्यक्तीने यादव यांच्या तोंडाला काळी शाई फासली.

सागर भंडारी असं या हल्लेखोराचं नाव असल्याचं समजलंय. मेडिकल चेकअपसाठी त्याला पोलिसांनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. हल्लेखोर वीर सेना या संघटनेशी संबंधित असल्याचा दावा या संघटनेनं केलाय.

भंडारीने 'भारत माता की जय' अशा घोषणा देत योगेंद्र यादव यांच्या चेहर्‍याला काळी शाई फासली. घटनास्थळी असलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले आणि बेदम चोप दिला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.

या अगोदरही आपचे नेते अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण यांच्यावर काळी शाई फेकण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता योगेंद्र यादव यांना टार्गेट करण्यात आलंय. मात्र योगेंद्र यादव यांनी या घटनेबद्दल अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली. मला या घटनेचा खेद नाही. राजकारणात अशा गोष्टी होतच असतात. याची काही किंमत द्यावी लागत असेल तर ती देण्यात आपण तयार आहोत. ज्याने कुणी शाई फेकली त्याला यादव यांनी माफही केलंय. तसंच यादव यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2014 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close