S M L

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात

13 मार्च दिल्लीकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. दिल्लीत नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जागावाटपाबाबतची बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, नारायण राणे हे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची ही तब्बल नववी बैठक आहे. या बैठकीतच अंतिम निर्णय होईल, असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय.आता केवळ मित्र पक्षांच्या दोन-तीनच जागांविषयीचाच निर्णय होणं बाकी आहे, असं सूत्रांकडून समजतंय. काँग्रेस जरी आठवलेंसाठी शिर्डी मतदारसंघ सोडायला तयार नसेल तरी आठवलेंसाठी एक जागा नक्कीच सोडली जाईल अशी हमी राष्ट्रवादीनं दिली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2009 04:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2009 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close