S M L

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

Samruddha Bhambure | Updated On: Mar 12, 2014 07:34 PM IST

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

shraddhanjali12 मार्च :  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज मानवंदना देण्यात आली. जगदलपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री रमणसिंग यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारनं सगळ्या नक्षलग्रस्त भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केलीय. या हल्ल्याचा तपास NIA कडे देण्यात आलाय.

सुकमा जिल्ह्यातल्या जिरमघाटी भागात झालेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एका नागरिकाचा बळी गेला होता. जिरमघाटी आणि टोंगपाल यांना जोडणार्‍या रस्त्याचं बांधकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. जवळपास 200 नक्षलवाद्यांनी या जवानांना घेरून हल्ला केला. या हल्ल्यानंतर जिरमघाटी आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

तीन हजार ते चार हजार पोलिसांची अतिरिक्त कुमक छत्तीसगडला पाठवण्यात आलीय. केंद्रीय गृहमंत्री, गृहसचिवही उद्या छत्तीसगडला रवाना होताहेत. याआधी, गेल्या वर्षी मे महिन्यात जिरमघाटीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात काँग्रेस नेत्यांसह 27 जण मृत्यमुखी पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2014 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close