S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा घोळ कायम

14 मार्च दिल्लीकाँग्रेसच्या आणि राष्टवादीच्या नेत्यांची शनिवारी दिल्लीत आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते गेले तीन दिवस दिल्लीत तळं ठोकून आहेत. राष्ट्रवादीबरोबर सुरू असलेला जागावाटपाचा घोळं, संपवण्यासाठी दहावी संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी शुक्रवारी नववी बैठक झाली. पण यात कोणताच निर्णय झालेला नाही.याबैठकीत झालेल्या निर्णयाबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, दहा जागांवर निर्णय होऊ नाही. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणालेत की तीन जागांवर निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल समजायला मार्ग नसल्यामुळे घोळ वाढतच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2009 10:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2009 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close