S M L

'निर्भया'च्या मारेकर्‍यांना फाशीच !

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2014 04:19 PM IST

delhi gang fashi13 मार्च : 'निर्भया'च्या मारेकर्‍यांना फाशीचीच शिक्षा कायम असणार आहे. दिल्ली गँगरेप प्रकरणी चारही दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आलीय.

बलात्कार आणि हत्ये प्रकरणी दुर्मिळातील दुर्मिळ खटला नमूद करत ट्रायल कोर्टाने आरोपी मुकेश, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्माला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपीच्या वकिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

हाय कोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत आरोपींना फाशीच द्यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. 16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांनी एका 23 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तसंच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली होती या मारहाणीमुळे या तरुणीचा 11 दिवसांनंतर मृत्यू झाला होता.

सहा आरोपींपैकी एक आरोपी रामलालने तिहार तुरूंगात आत्महत्या केली तर एकजण अल्पवयीन सिद्ध झाला. त्यामुळे चारही आरोपींवर बलात्कार, खून, लूटमार, अनैसर्गिक गुन्हा असे एकूण 13 आरोप सिद्ध झाले. या चारही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता हायकोर्टाने कायम ठेवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2014 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close