S M L

नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2014 11:41 PM IST

नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार

modi_rajnath15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसीतून रिंगणात उतरणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. मोदी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौमधून निवडणूक लढवणार आहे.

भाजपने उशिरा रात्री पत्रकार परिषद घेऊन 55 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मोदींसाठी वाराणसीची जागा सोडणारे मुरली मनोहर जोशी कानपूरमधून निवडणूक लढवणार आहे. तर अरूण जेटली अमृतसरमधून निवडणूक लढवणार आहे. तर दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन यांना उमेदवारी देण्यात आलीय.

हर्ष वर्धन चांदणी चौकमधून निवडणूक लढवणार आहे. तर सुल्तानपूरमधून वरुण गांधी, पीलीभितमधून मेनका गांधी तर उमा भारती झांसीमधून निवडणूक लढवणार आहे. तसंच खाकी वर्दी सोडून खादी वर्दीसाठी पोलीस आयुक्तपद सोडणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना उत्तर प्रदेशच्या बागपतमधून उमेदवारी जाहीर झालीय. आणि अभिनेत्री किरण खेर चंदीगडमधून उमेदवारी देण्यात आलीय.

मोदींसाठी वाराणसीच का ?

  • - देवळांचं शहर असलेलं वाराणसी 'हिंदुत्त्वाच्या' मुद्द्यासाठी योग्य शहर आहे
  • - मोदींनी इथून निवडणूक लढवली तर त्याचा आसपासच्या जागांवरही परिणाम होईल
  • - सध्या भाजपकडे पूर्व उत्तर प्रदेशमधल्या 32 पैकी फक्त 4 जागा आहेत
  • - 1998 मध्ये भाजपला पूर्व उत्तर प्रदेशातून 24 जागा मिळाल्या होत्या.
  • - 1991 पासून 2004 पर्यंत ही जागा भाजपनेच जिंकलेली आहे
  • - 2009 मध्येही ही जागा भाजपने जिंकली
  • - मुरली मनोहर जोशी याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2014 11:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close