S M L

२००९ पेक्षा यंदा आम्ही जास्त जागांवर विजय मिळवू - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2014 07:04 PM IST

rahul team16 मार्च :   सध्या देशात केंद्र सरकारविरोधी लाट असली यंदाच्या निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसला कमी लेखू नये असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे. काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची असून या निवडणुकीत आमचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पीटीआय या वृत्तसंस्थेला राहुल गांधींनी रविवारी मुलाखात दिली असून यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाटचाल, नरेंद्र मोदी अशा विविध विषयांवर भाष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, काही प्रमाणत देशात काँग्रेस सरकारविरोधात लहर आहे. पण आम्ही यंदा चांगली कामगिरी करु. २००९ पेक्षा यंदा आम्ही जास्त जागांवर विजय मिळवू असा दावा त्यांनी केला. आमचे कार्य आम्ही अधिक आक्रमकपणे जनतेपर्यंत पोहोचवू शकलो असतो अशी कबुली त्यांनी दिली.

२०१४ मध्ये पुन्हा एकदा युपीए - ३ चे सरकार सत्तेवर येणार असून सत्ता स्थापनेत समविचारी पक्षांची मदत घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2014 07:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close