S M L

'प्रामाणिक मोदीं'चा दावा विकिलिक्सने ठरवला खोटा

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2014 10:13 PM IST

'प्रामाणिक मोदीं'चा दावा विकिलिक्सने ठरवला खोटा

wikileaks_modi17 मार्च : आपल्या खुलाशांनी जगभरात खळबळ माजवणार्‍या विकिलिक्स या वेबसाईटने आज (सोमवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिल्यानं मोदींच्या प्रचार मोहिमेला चांगलाच धक्का बसलाय.

मोदी हे प्रामाणिक असल्याचं विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिअन असांज यांनी कधीच म्हटलेलं नाही, असं ट्विट विकिलिक्सनं केलंय. मोदी भ्रष्ट नाहीत आणि म्हणून अमेरिकेला मोदींची भीती वाटतं, असे असांजची स्वाक्षरी असलेले पोस्टर्स मोदी समर्थक गेले काही दिवस वाटत आहेत.

पण, हे पोस्टर्स खोटे आहेत आणि भाजप समर्थक खोटा प्रचार करत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलं आहे. मोदी हे लोकप्रिय आहेत आणि भारतीयांना ते प्रामाणिक वाटतात, असं आपल्या केबल्समध्ये म्हणण्यात आलं होतं, असं विकिलिक्सकडून स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2014 10:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close