S M L

काँग्रेसची राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी

17 मार्च दिल्ली आशिष दीक्षितकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा नवव्या फेरीनंतरही पूर्ण झालेली नाही. अशातच काँग्रेस आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसतेय. दिल्लीत सोमवारी रात्री झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत सर्वच्या सर्व 48 जागांवर चर्चा करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सगळ्या 48 जागांच्या उमेदवारांची यादी बनवण्याचीही प्रक्रियाही सुरू आहे.सोमवारी रात्री झालेली काँग्रेसची बैठक फक्त उमेदवारांच्या निवडीसाठी होती. पण त्यात ती स्वबळावर निवडणूक लढवता येईल का या प्रश्नावर चर्चा झाली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत पक्षश्रेष्टींनी राज्यातून आलेल्या नेत्यांकडून सर्व 48 जागांचा आढावा घेण्यात आला.आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यातआली असली तरी अजूनही तीन ते चार जागांवर एकमत होऊ शकलेलं नाही. जर एवढ्यावरून आघाडी मोडायचीच वेळ आली तर त्यावेळच्या परिस्थितीचा आम्ही विचार केला, असं बैठकीला उपस्थित असलेल्या विलासराव देशमुखांनी सांगितलं. पण राष्ट्रवादीसोबत आघाडी होईल असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. शरद पवार दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस हायकमांडला भेटतील अणि जागा वाटपाची समस्या हायकमांडच्या पातळीवर लवकर सुटेल असंही त्यांनी सांगितलं. तसंच रामदास आठवलेंसाठी एक जागा नक्कीच सोडू हेही सांगायला ते विसरले नाहीत.काँग्रेसच्या छाननी समितीचं काम आता जवळपास पूर्ण होत आलंय. उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप दिलं जातंय. पण बंडखोरीच्या भीतीमुळे यादी जाहीर करायला उशीर केला जातोय. विधानसभेच्या अधिवेशनाचं निमित्त करून पहिली यादी जाहीर करण्याची तारीख तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादीबद्दल अविश्वास निर्माण झाल्यामुळे निवडणूक स्वबळावर लढवावी अशी भावना सोमवारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीतही व्यक्त करण्यात आली. पण तसं केलं तर त्याचा सरळ फायदा शिवसेना भाजप युतीला होईल याची पूर्ण कल्पना काँग्रेस हायकमांडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2009 05:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2009 05:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close