S M L

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा लवकरच

17 मार्च आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पहिली यादी तयार झाली आहे. या उमेदवारांची घोषणा लवकरच दिल्लीत होणार आहे. आयबीएन-लोकमतच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यादीत 10 ते 11 उमेदवारांची वर्णी लागणार असून गोपीनाथ मुंडे बीड मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, विनोद तावडे हे नेते सहभागी झाले होते. आज जाहीर होणा-या यादीत विद्यमान खासदार असण्याची शक्यता आहे. आयबीएन - लोकमतचे रिपोर्टर आशिष दीक्षित यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी खास बातचीत केली. केंद्राच्या राजकारणात गेलो तरीही राज्याशी असलेली आपली नाळ तोडणार नाही, असं मुंडे यांनी सांगितलं. आज जाहीर होणा-या यादीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचंही नाव असण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीतली संभाव्य नावं : बीड - गोपीनाथ मुंडेनागपूर - बनवारीलाल पुरोहित अकोला - संजय धोत्रेरावेर - हरिभाऊ जावळेदिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाणमाढा - सुभाष देशमुखसोलापूर - सुभाष बनसोडजालना - रावसाहेब दानवे

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2009 12:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2009 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close