S M L

साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा

17 मार्च, पुणे 82 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पुण्यात साहित्य परिषदेकडे दिला आहे. राजीनाम्याची अधिकृत घोषणा त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली. " सद्यस्थितीचा साकल्यानं विचार करत मी साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. विभा देशपांडे यांच्याकडे नियोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, " असं डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. आनंद यादवांच्या राजीनाम्यानं साहित्य संमेलन होणार की पुढे ढकललं जाणार याची चर्चा साहित्य वर्तुळात चालू आहे. " साहित्य संमेलन नियोजित वेळी, ठरावीक तारखेला होणार असल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकाराव ठाले - पाटील यांनी दिली. " साहित्य संमेलन तोंडावर आलं असताना अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा देणं, असा पेच प्रसंग कधी उभा राहिला नव्हता. तो आता नव्यानं उभा राहिला आहे, " अशी प्रतिक्रिया कौतिकराव ठाले - पाटील यांनी दिली आहे. याविषयी 19 मार्चला संध्याकाळी अखिल भारतीय साहित्य महामंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात अध्यक्षपदाचा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी माहिती कौतिकराव ठाले - पाटील यांनी दिली. डॉ. आनंद यादव यांची ' संतसूर्य तुकाराम ' ही संत तुकारामांवरची चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीत तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दल वादग्रस्त विधानं असल्यामुळे वारकरी संपद्रायाने तीव्र विरोध केला होता. वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंडा तात्या कराडकर यांनी आनंद यादवांच्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. वारकरी संप्रदायानं ' संतसूर्य तुकाराम ' या चरित्रात्मक कादंबरीवरचं प्रकरण लावून धरलेलं प्रकरण पेटता क्षणी आनंद यादव माफी मागितली. त्यानंतर त्यांनी देहूला जाऊन संत तुकारामांच्या सामाधीचं दर्शन घेतलं. वारक-यांची आक्रमक भूमिका कायमच राहिली. डॉ. आनंद यादव यांच्या राजीनाम्याची मागणी करत वारकरी संमेलनाच्या ठिकाणी आंदोलन म्हणून तुकोबांच्या गाथेचं पारायण करणार होते. दोन दिवसांपूर्वी देहूतल्या वारकर्‍यांच्या मेळाव्यात आनंद यादव यांना धक्काबुक्कीही झाली होती. अखेर या वादावर तोडगा न निघाल्यामुळेआनंद यादव यांनी आपला राजीनामा सादर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2009 02:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2009 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close