S M L

काँग्रेसला धक्का, खा.सत्पाल महाराज भाजपमध्ये

Samruddha Bhambure | Updated On: Mar 21, 2014 04:04 PM IST

काँग्रेसला धक्का, खा.सत्पाल महाराज भाजपमध्ये

satpal maharaj21 मार्च : लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडचे काँग्रेसचे खासदार सत्पाल महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी संधी मिळायला हवी असं ही त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला 5 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सत्पाल महाराज यांनी स्पष्ट केलं आहे. यापैकी 4 काँग्रेसचे आमदार आहेत तर 1 अपक्ष आहे. या आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस सराकारला उत्तराखंडमध्ये बसपा आणि अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल.

चिदंबरम यांचा निवडणूक लढण्यास नकार

तर काँग्रेसला दुसरा धक्का दिला आहे तो केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी. चिदंबरम यांनी निवडणूक लढवायला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी आता त्यांचा मुलगा कार्तीक याला तिकीट देण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनाही हमीरपूरमधून निवडणूक लढवण्याविषयी विचारण्यात आलं होतं पण त्यांनीही यासाठी नकार दिला आहे. पण आपल्याला असं विचारण्यातच आलं नव्हतं असं आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2014 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close